Ad Code

6/recent/ticker-posts

maharashtra GK in Marathi: महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी । सामान्य ज्ञानाचे २५ महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे.

 विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GK) हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो. या विषयात इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, कला आणि सांस्कृतिक ज्ञान यासारख्या विविध विषयाचा समावेश असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे  देण्यासाठी सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.janral nolej question in marathi

  महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी : महाराष्ट्र हा एक समृद्ध आणि विविधतापूर्ण राज्य आहे, जिथे इतिहास, संस्कृती आणि आधुनिकता यांचा संगम आहे. 'महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी' विषयी अधिक जाणून घेणे आपल्याला या महाराष्ट्र राज्याच्या  महत्त्वाच्या अंगांवर प्रकाश टाकेल.

महाराष्ट्र हे एक समृद्ध राज्य आहे , त्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारशामुळे ओळखले जाते. म्हणून आज या  ब्लॉग पोस्टमध्ये आपण महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या जनरल नॉलेजच्या बाबींवर प्रकाश टाकणार आहोत. 

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी


१. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? 

उत्तर-  भामरागड


२. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दूष्टीने सर्वात मोठा कोणता जिल्हा आहे? 

उत्तर-  अहमदनगर


३.महाराष्ट्राचा राज्य पशू कोणता? 

उत्तर- शेकरू


४.महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? 

उत्तर- हरियाल


५.महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? 

उत्तर- लातूर


६.महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? 

उत्तर- ब्लू मॉरमॉन

महाराष्ट्र राज्य फुलपाखरू

७.महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यला ओळखला जातो? 

उत्तर- नंदूरबार


८.महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? 

उत्तर- कोयना


९.महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? 

उत्तर- जायकवाडी


१०.महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? 

उत्तर- तारापूर


Gadchiroli general knowledge । गडचिरोली सामान्य ज्ञान GK


११.महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश म्हणून कोणाला ओळखले जाते? 

उत्तर- पूर्व विदर्भ


१२.महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? 

उत्तर- गंगापूर


१३. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? 

उत्तर- ७२० किलो मिटर


१४. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? 

 उत्तर-  सहा . ( कोकण, नाशिक, पुणे, नागपुर, अमरावती, छ. संभाजीनगर) 


१५. ०१ मे १९६६० रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 

उत्तर-  २६ 


१६. महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता? 

 उत्तर-  पालघर


महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी


१७. महाराष्ट्र राज्याची पूर्व- पश्चिम लांबी किती कि मी आहे? 

 उत्तर-  ८०० किमी


१८. महाराष्ट्रातील सर्वोच शिखर कोणते? 

 उत्तर-  कळसूबाई


१९. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? 

उत्तर-   सातपुडा


२०. महाराष्ट्राचा ८०% टक्के भाग कोणत्या खडकने व्यापला आहे? 

 उत्तर-  बेसॉल्ट खडक


२१. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?  

उत्तर-  गोदावरी


२२. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग कोणत्या दोन शहरांपासून सुरू झाला? 

उत्तर- मुंबई - ठाणे


२३. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार कोठे आहे? 

उत्तर-  नांदेड


२४. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? 

उत्तर-  नाशिक


२५. महाराष्ट्रात " माडिया गोंड " आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? 

 उत्तर- गडचिरोली

आजची  लेख तुम्हाला आवडली असली तर आपल्या मित्रांना नक्की "Share" करा..!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या