विद्यार्थीमित्रांनो गडचिरोली जिल्हा पातळी वर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये Gadchiroli general knowledge यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले जाणे सामान्य आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे सामान्य ज्ञान (Gadchiroli general knowledge ) आणि चालू घडामोडी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
या लेखात आपण (Gadchiroli general knowledge ) गडचिरोली जिल्ह्याच्या सामान्य ज्ञानावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तसेच, जिल्ह्यातील काही चालू घडामोडींचाही आढावा घेणार आहोत.
गडचिरोली जिल्हा: सामान्य ज्ञान (गडचिरोली सामान्य ज्ञान)
प्रश्न 1: गडचिरोली जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?
गडचिरोली जिल्हा घनदाट जंगलाने व डोंगर द-याने व्याप्त असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी जवळपास ७६ % टक्के भाग जंगलाने व्याप्त आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राचा हिरवा हृदय व जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, हा जिल्हा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, समृद्ध संस्कृतीसाठी आणि विविधतापूर्ण वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न 2: गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?
गडचिरोली जिल्ह्याची स्थापना २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्हा विभाजन करून करण्यात आली. गडचिरोली जिल्हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट होता, जिथे गडचिरोली आणि सिरोंचा चंद्रपूर जिल्ह्यात तहसिल म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४,४१२ चौ. किमी आहे. जिल्ह्यात १२ तालुके व सहा महसूल उपविभाग आहेत. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 4.68% क्षेत्रफळ भाग गडचिरोली जिल्ह्याचा आहे.
प्रश्न 3: गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या ?
वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, दिना या गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत.
- वैनगंगा : वैनगंगा ही मध्य प्रदेश राज्यातून उगम होऊन महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातून वाहते. ही नदी गडचिरोली जिल्हातील प्रमुख नदीपैकी एक आहे आणि ही गोदावरीची उपनदी आहे.
- गोदावरी : गोदावरी नदी ही जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम सीमेवर, सिरोंचा जवळ, जिल्ह्यात प्रवेश करते आणि जिल्ह्याच्या दक्षिण सीमेने सुमारे 50 किमी पूर्वेकडे वाहते.
- प्राणहिता : प्राणहिता ही नदी वैनगंगा आणि वर्धा नद्यांच्या संगमाने निर्माण झालेली नदी आहे.
- दिना : दिना नदी ही प्राणहिता नदीची मुख्य उपनदी आहे.गाढवी
गाढवी, खोब्रागडी ,पाल वेलोचना, कठाणी, शिवानी, पोर, दर्शनी या नद्या देखील जिल्ह्यातून वाहतात.
0 टिप्पण्या