Ad Code

6/recent/ticker-posts

Gadchiroli general knowledge । गडचिरोली सामान्य ज्ञान GK। Gadchiroli GK in marathi

 विद्यार्थीमित्रांनो गडचिरोली  जिल्हा पातळी वर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये  Gadchiroli general knowledge यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले जाणे सामान्य आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे सामान्य ज्ञान (Gadchiroli general knowledge ) आणि चालू घडामोडी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

या लेखात आपण (Gadchiroli general knowledge ) गडचिरोली जिल्ह्याच्या सामान्य ज्ञानावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तसेच, जिल्ह्यातील काही चालू घडामोडींचाही आढावा घेणार आहोत.

Gadchiroli GK in marathi


गडचिरोली जिल्हा: सामान्य ज्ञान (गडचिरोली सामान्य ज्ञान)


प्रश्न 1: गडचिरोली जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?

गडचिरोली जिल्हा घनदाट जंगलाने व डोंगर द-याने व्याप्त  असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी जवळपास ७६ % टक्के भाग जंगलाने व्याप्त आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा हा  महाराष्ट्राचा हिरवा हृदय व जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, हा जिल्हा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, समृद्ध संस्कृतीसाठी आणि विविधतापूर्ण वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे.


प्रश्न 2: गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?

गडचिरोली जिल्ह्याची स्थापना २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्हा विभाजन करून करण्यात आली. गडचिरोली जिल्हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट होता, जिथे गडचिरोली आणि सिरोंचा चंद्रपूर जिल्ह्यात  तहसिल म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४,४१२ चौ. किमी आहे. जिल्ह्यात १२ तालुके व सहा महसूल उपविभाग आहेत. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 4.68% क्षेत्रफळ भाग  गडचिरोली जिल्ह्याचा आहे.


प्रश्न 3: गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या ?

वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, दिना  या गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत.

  • वैनगंगा : वैनगंगा ही मध्य प्रदेश राज्यातून उगम होऊन  महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातून वाहते. ही नदी गडचिरोली जिल्हातील प्रमुख नदीपैकी एक आहे आणि ही गोदावरीची उपनदी आहे.
  • गोदावरी : गोदावरी नदी ही जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम सीमेवर, सिरोंचा जवळ,  जिल्ह्यात प्रवेश करते आणि जिल्ह्याच्या दक्षिण सीमेने सुमारे 50 किमी पूर्वेकडे वाहते.
  • प्राणहिता : प्राणहिता ही नदी वैनगंगा आणि वर्धा नद्यांच्या संगमाने निर्माण झालेली  नदी आहे. 
  • दिना : दिना नदी ही प्राणहिता नदीची मुख्य उपनदी आहे.गाढवी

गाढवी, खोब्रागडी ,पाल वेलोचना, कठाणी, शिवानी, पोर, दर्शनी या नद्या देखील जिल्ह्यातून वाहतात.


प्रश्न 4: गडचिरोली जिल्ह्यात एकूण  किती तालुके आहेत?

गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा), कुरखेडा,  कोरची, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, मुलचेर, सिरोंचा असे एकूण १२ तालुके आहेत आणि जिल्ह्यात ६ महसूल विभाग असून प्रत्येक महसूल उपविभागात दोन तालुके शामिल आहेत.

प्रश्न 5: गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत?

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५७ ग्राम पंचायती, ९ नगर पंचायती (कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड) असून तीन नगरपालिका गडचिरोली,  देसाईगंज (वडसा)  व आरमोरी आणि १२ पंचायत समीती व एक जिल्हा परीषद आहे. 


प्रश्न 6: गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पोलीस अधीक्षक (SP) कोण आहेत?

श्री. नीलोत्पल. (भापोसे). हे गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पोलीस अधीक्षक (sp) आहेत. 


प्रश्न 7: गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे ?

श्री. संजय दैने. भाप्रसे हे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सध्याचे आहेत. 

प्रश्न 8: गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ? 

राज्याचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत.

प्रश्न 9: गडचिरोली जिल्ह्यातील अभयारण्याचे नाव काय आहे?

चपराळा वन्यजीव अभयारण्य हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये  असून चामोर्शी तालुक्यात स्थित आहे आणि  140 कि.मी. क्षेत्रात पसरलेला आहे.


प्रश्न 10: 2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची 'लोकसंख्येची घनता' काय आहे?

गडचिरोली जिल्ह्याचा 2011 च्या जनगणनेचा अधिकृत तपशील नुसार 2011 मध्ये, गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या 1,072,942 होती ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांची संख्या अनुक्रमे 541,328 आणि 531,614 होती त्यामुळे  गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 74 चौ.कि.मी आहे. 


गडचिरोली जिल्ह्याच्या सामान्य ज्ञानावर  (Gadchiroli general knowledge ) प्रभुत्व मिळवण्यासाठी नियमित अभ्यास आणि सततची सराव आवश्यक आहे. 

आपल्या मित्रांना नक्की "Share" करा..!!

Online सराव पेपर सोडवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या