Ad Code

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र शासनाच्या 50 हजार योजनादूत पद भरती अर्ज प्रक्रिया सुरू । Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय च्या वतीने मुख्यमंत्री_योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  १८ ते ३५ वयोगटातील इच्छुक उमेदवार या उपक्रमात अर्ज सादर करू शकतो, उमेदवार हा  पदवीधर असावे आणि संगणक ज्ञान, स्मार्ट फोन, आधार संलग्न  खाते असणे  आवश्यक आहे. निवडलेल्या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी. 






उपक्रमाचे उद्दिष्ट

महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, "शासन आपल्य दारी" हा उपक्रम थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवसाठी शासनाने राबवला. या उपक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे. योजनादूत हा या उपक्रमाचा विस्तार आहे, ज्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा आहे.
योजनादूत म्हणून 50,000 तरुणांना इंटर्नशिपची संधी
सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग
कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचणार



मुख्यमंत्री योजनादूत ची पात्रता. 

शैक्षणिक पात्रता:  साधारणपणे, कोणत्याही शाखेचा पदवीधर, उमेदवाराला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: सामान्यत: 18 ते 35 वर्षे या वयोगटातील व्यक्तींसाठी ही संधी असते. 

स्थानिक: उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.

कसे करावे अर्ज?

  • योजनादूत पोर्टलवर ‘उमेदवार नोंदणी’ वर क्लिक करा.
  • पात्रतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
  • नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा आणि OTP पाठवलेल्या फोनची पडताळणी करा.
  • सत्यापनानंतर तुमचा आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि ईमेलवर पाठवलेला OTP सत्यापित करा.
  • तुम्ही आपोआप लॉग इन व्हाल. प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आयडी वापरावा लागेल.
  • तुमची शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा आणि संबंधित कागदपत्रे संलग्न करा.
  • एकदा तुमचे प्रोफाइल मंजूर झाले की तुम्ही रिक्त जागा टाकू शकता. 
  • रिक्त जागा तुम्हाला दाखवल्या जातील. तुम्ही ते फिल्टर करू शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता. 



आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज
आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवी प्रमाणपत्र
रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह)
वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल. 



योजना दूताचे काम काय असते?

  • संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील.
  • प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील.
  • योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करतांना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील.
  • योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करुन तो ऑनलाईन अपलोड करतील.
  • योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी/नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत, तसेच ते गुन्हेगारी स्वरुपाचे/गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येवून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
  • योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही.




महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईट:   Click Here

GR PDF:  Click Here


नोट: योजना दूत भर्तीची तारीख, पात्रता, चयन प्रक्रिया इत्यादी माहिती वेळोवेळी बदलू शकते. अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र सरकारच्या संबंधित वेबसाइटला भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या